New Palace Kolhapur
न्यू पॅलेस कोल्हापूर . . . ' कसबा बावडा ' मार्गावरील हा प्राचीन व ऐतिहासिक राजवाडा आहे . घासून तुळतुळीत काळ्या दगडाने बांधलेला हा राजवाडा म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमूना आहे . पर्यटकांचे खास आकर्षण आहे . मध्यभागी उंच मनोरा असलेल्या राजवाड्यास आठ कोन आहेत . मनोऱ्यावरील घड्याळ १८८७ साली बसविले आहे . इतर दोन मनोरे निरनिराळ्या अंतरावर आहेत . ही वास्तू म्हणजे ' छत्रपती राजर्षी शाहू महाराज ' यांचे निवासस्थान . आज या राजवाड्याचे रूपांतर महाराजांच्या वस्तूसंग्रालयामध्ये झाले आहे . आजही येथे महाराजांचा दरबार त्याच्या जीवनाशी संबंधीत वस्तू पुरावे पाहायला मिळतात. • छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्म : २६ जून इ.स. १८७४ कागल , कोल्हापूर राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४ मृत्यू : ६ मे १९२२ , मुंबई राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा चौथे शाहू , अर्थात छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते . सामाजिक क्रांतीचे अग्रदूत , सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवीन जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते . शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण...